भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दादर येथील चैत्यभूमी येथे माननीय राज्यपाल श्री. रमेश बैस यांनी आज सकाळी पुष्प वाहून अभिवादन केले. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, मुंबई शहर जिल्हाधिकारी श्री. संजय यादव, मुंबई उपनगरे जिल्हाधिकारी श्री. राजेंद्र क्षीरसागर, उपआयुक्त (परिमंडळ २) श्री. प्रशांत सपकाळे, सहआयुक्त (जी उत्तर) श्री. अजितकुमार आंबी व इतर मान्यवर उपस्थित होते. #DrBRAmbedkarJayanti @maha_governor
@mybmc आपण सर्व वरिष्ठ अधिकारी आपल्या कार्यात कार्यमग्न असता यात आनंद आहे. आपल्या महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामध्ये कुटुंब निवृत्ती वेतन मंजूर होण्याकरिता फारच विलंब होत आहे याबाबत आम्ही कोणाकडे दाद मागावी याचे मार्गदर्शन व्हावे. माझा मोबाईल क्रमांक ९१६८४६५७४०, ७५५८३८२०४७